“भाजपचेही मी आभार मानते, माझाही ध्यास अंधेरीचा विकास…”- ऋतुजा लटके

210 0

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकी मधून भाजपने अखेर माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान ही निवडणूक भाजपने लढू नये, असे पत्र राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले होते. त्यानंतर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये अंधेरी पूर्व पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये भाजपनेही निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला.

दरम्यान अंधेरी पोट निवडणुकीतून भाजपने माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, ” मी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानते, माझे पती रमेश लटके यांच्या कामाबद्दल त्यांचे सर्वांशी असणारे सहकाराचे नाते यामुळे आज मला हा आशीर्वाद मिळाला. भाजपचेही मी आभार मानते ! माझाही ध्यास अंधेरीचा विकास हाच असेल…!”अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांनी दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!