BIG NEWS : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध होणार? भाजपाची महत्त्वाची बैठक सुरू

369 0

मुंबई : अंधेरी पूर्व पोट निवडणुकी बाबत भाजपचा पेज अधिकच वाढत चालला आहे. रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेघदूत या त्यांच्या बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि निवडणुकीचे उमेदवार मुरजी पटेल हे उपस्थित होते. या चर्चेमध्ये मुरजी पटेल हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. तर आशिष शेलार यांनी देखील त्यांचे समर्थन केले असून, मुरजी पटेल हे विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट उसळली आहे. सर्वप्रथम राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भाजपने ही पोट निवडणूक लढवू नये असे आवाहन केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे वक्तव्य केले. या सर्वच घडामोडींमुळे भाजपचा पेज आणखीनच वाढला आहे.

त्यामुळे एकीकडे भाजप आता नक्की काय भूमिका घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेलं असतानाच, या विषयावर निर्णय घेण्यासाठी भाजपची महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये या विषयावर चर्चा होऊन लवकरच अंतिम निर्णय येऊ शकतो. दरम्यान एकंदरीत राजकीय वातावरण पाहता अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

Share This News
error: Content is protected !!