दिवाळी जवळ आली आहे, पण पार्लरला जायला वेळ नाही? असे करा घरच्या घरी पेडिक्युअर-मेनिक्युअर

360 0

दिवाळी जवळ आली आहे. त्यामुळे गृहिणींचा अर्धा वेळ घराची साफसफाई,सजावट आणि फराळ बनवण्यामध्ये जाणार आहे. पण स्वतःकडे लक्ष द्यायला अनेकींना वेळच होत नसतो. मग अशा वेळी पेडिक्युअर मिनी केअर घरच्या घरी कसं करायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. जेणेकरून पार्लरला जाण्याचा वेळ देखील तुमचा वाचेल, पैसेही वाचतील आणि तुमच्या सौंदर्यात देखील भर नक्कीच पडेल.

चेहरा जसा सुंदर दिसावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो, पण हात आणि पाय हे स्वच्छ आणि सुंदर दिसावेत, यासाठी देखील अनेक महिला प्रयत्न करत असतात. अनेक नोकरदार महिला आणि गृहिणी यांना आपल्या कर्तव्यपूर्ती करताना या गोष्टींकडे लक्ष देणं होत नाही. मग पाण्यामधलं काम सातत्याने वेगवेगळे केमिकल्स, हाताला बसणारे चटके यामुळे कुठेतरी सौंदर्यामध्ये कमतरता येऊ लागते. पण स्त्रीमन हे नेहमीच स्वतःच्या सौंदर्याकडे जास्त लक्ष देण्यासाठी आकर्षित होत, असतं बरोबर ना? चला तर मग पाहूयात घरच्या घरी पेडिक्युअर आणि मेनिक्युअर करण्यासाठी तुम्हाला काय साहित्य लागणार आहे ते…

See the source image

थोडे गरम पाणी करून घ्या. एक टब, दोन बाऊल ,कोणताही चांगल्या क्वालिटीचा शाम्पू ,मीठ ,लिंबू ,कोणताही स्क्रब, दिवाळीसाठी आणलेले उठणे देखील चालेल ,तेही नसेल तर डाळीच्या पिठामध्ये हळद घाला आणि ते मिश्रण तयार ठेवा, नेल फायलर ,नेल कटर ,टाच घासण्याचा दगड ,पेट्रोलियम जेली…

जे काही साहित्य तुम्हाला सांगितला आहे ते अगदी घरामध्ये तुम्हाला सहज मिळेल. टाच घासण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये स्क्रब सहज मिळेल. किंवा दगड अगदी सहज मिळूनच जातो. त्यामुळे हे साहित्य घरामध्ये अवश्य बाळगा.

आता सर्वात प्रथम टबमध्ये तुमच्या पायांना सहन होईल एवढे गरम पाणी घाला. अगदी कडकडीत पाणी आवश्यक नाही, पण अगदी कोमट पाणी देखील घेऊ नका. या पाण्यामध्ये एक चमचा मीठ, एक लिंबू पूर्ण पिळून त्याचे साल देखील पाण्यामध्ये टाकून द्या. शाम्पू दोन चमचे टाका.

या पाण्यामध्ये तुम्हाला तुमचे पाय 15 ते 20 मिनिटे सोक करायचे आहेत. तसेच दोन बाऊलमध्ये पाणी घेऊन मीठ, लिंबू, शाम्पू घालून त्यामध्ये हात देखील घालून ठेवा. म्हणजे हात आणि पायाचे एक साथ पेडिक्युअर-मॅनिक्युअर करू शकाल.

चांगले 15 ते 20 मिनिटे हातपाय सोक केल्यानंतर स्क्रबरने टाच अंगठा आणि पाय स्वच्छ घासून घ्या. विशेषतः टाच स्वच्छ घासा. कारण टाचेवर सर्वाधिक मृतपेशी जमा होतात. त्यानंतर पुन्हा पाय थोडे गरम पाण्यामध्ये साफ करून घेऊन, पाय ओले असतानाच त्यावर स्क्रब लावा. उटणे किंवा हळद डाळीचे पीठ एकत्र करून लावा. हे स्क्रब तुम्हाला कमीत कमी पाच मिनिटे तरी व्यवस्थित गोलाकार आकारामध्ये स्क्रब करून घ्यायचे आहे गुडघ्यापर्यंत स्क्रब केल्यास अधिक चांगले.

चांगले स्क्रबिंग झाल्यानंतर पाय स्वच्छ धुऊन हे पाणी आता बाजूला करून ठेवा. यातील लिंबू पिळून साल जे आपण पाण्यामध्ये टाकली होती. ती घ्या आणि पाय स्वच्छ पुसल्यानंतर या लिंबाने तुमच्या नखांवर गोलाकार आकारामध्ये मसाज करत राहा. हे झाल्यानंतर पुन्हा एकदा पाय स्वच्छ पुसा. आता नेल फायलर घेऊन नखांना वरच्या बाजूने फाईल करून घ्या. योग्य आकार आणि नखांच्या बाजूची घाण देखील काढून घ्या. नेलकटरच्याच सहाय्याने आजूबाजूच्या मृतपेशी देखील काढून टाका. पाण्यामध्ये त्वचा सोक झाल्यानंतर मृतपेशी काढणं त्रासदायक अजिबात होत नाही. त्या सहज निघून जातात.

यानंतर नखांवर पेट्रोलियम जेली लावून ठेवा. आणि कोणतेही तुमच्या रोजच्या वापरातले बॉडी लोशन घेऊन संपूर्ण पायाला गुडघ्यापर्यंत पाच मिनिटे गोलाकार आकारात मसाज करा. मसाज झाल्यानंतर नखांवरील पेट्रोलियम जेली काढून घ्या. दोन दिवस नेलपेंट लावू नका. हीच प्रक्रिया हातांवर देखील करा.पेडिक्युअर आणि मेडिक्युअर केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो. नखांमधली घाण निघून जाते. पायांवरील मृतपेशी निघून गेल्यामुळे पायांचे आणि हातांचे सौंदर्य खुलून येते. दोन दिवसानंतर छान नेलपेंट लावा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!