ऐन दिवाळी ST प्रवाशांचं निघणार दिवाळं! 21 ते 31 ऑक्टोबर दरम्यान STची 10 टक्के हंगामी भाडेवाढ

346 0

एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला असून त्यानुसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही हंगामी भाडेवाढ करण्यात आला आहे.

21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर, 2022 पर्यत ही भाडेवाढ राहील. सदर भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी बसेसला लागू राहील. शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही.

1 नोव्हेंबरपासून ही भाडेवाढ संपुष्टात येऊन, नेहमी प्रमाणे तिकीट दर आकारले जातील असे एसटी महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!