HEAVY RAIN : पुन्हा जोरदार पाऊस, पुन्हा रस्त्यांचे झाले ओढे, पुणे तिथे काय उणे… PHOTO

840 0

पुणे : पुण्याला आज दुपारी पावसाने पुन्हा एकदा जोरदार झोडपून काढले आहे. कुलाबा हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार १८ ऑक्टोबर पर्यंत राज्यात पाऊस थैमान घालू शकतो. बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात अली आहे . त्यामुळे पुढचे ५ दिवस महाराष्ट्रासाठी सतर्कतेचे आहेत.

आज दुपारी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आणि पुन्हा एकदा पुण्यातील बहुतांश रस्त्याचे ओढे झाले. नागरिकांची चंगलीच दाणादाण उडाली.

ऐन शाळा सुटण्याच्या वेळामध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मुलांना घरी आणताना पालकांना चांगली तारेवरची कसरत करावी लागते आहे. रस्त्यावरील पाणी आणि वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण झाले आहेत. पुण्यामध्ये एस बी रोड,फर्ग्युसन रोड, जंगली महाराज रस्ता, मुंडवा, कोरेगाव पार्क, धनकवडी, सारसबाग या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले आहे.

Share This News
error: Content is protected !!