मेष राशी : मेष राशीसाठी आजचा दिवस जुन्या वादविवादातून सुटका होण्याचा आहे त्यामुळे मोकळा श्वास घ्याल आज तुम्हाला कोणीतरी जुना मित्र किंवा मैत्रिणी भेटणार आहे त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल ताजे तवाने व्हाल
वृषभ रास : वृषभ राशीसाठी आजचा दिवस खास आहे रोजचे धकाधकीचे जीवन सुरूच असणार आहे पण तरीही तुमचे मन प्रसन्न असेल कुटुंबासोबत वेळ घालवाल
मिथुन राशी : आज शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी समोर वाटीमध्ये गुळ आणि हरभऱ्याची डाळ ठेवा तुमच्या आत्मविश्वासामध्ये आज भर पडेल कुटुंबाचे देखील सहकार्य मिळणार
कर्क रास : कर्क राशीसाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे मित्र मैत्रिणी कुटुंबीयांसोबत आनंदात दिवस व्यतीत कराल प्रवासाचे बेत आखाल
सिंह रास : आजचा तुमचा दिवस छान जाणार आहे आज पर्यंत तुम्ही केलेल्या कष्टाचे चीज होणार आहे पण एकला चलो रे हा नारा लक्षात ठेवा
कन्या रास : आज थोडी तब्येतीची कुरबुर जाणवू शकेल धावपळ कमी करा बाकी दिवस उत्कृष्ट आहे खरेदीचे बेत आखाल
तूळ राशी : तोलून-मापून बोललेले शब्द आणि केलेले काम आज तुम्हाला फायदा करून देणार आहेत पण मोठे व्यवहार टाळावेत सगळं मनासारखे होणार आहे थोडा धीर धरा
वृश्चिक रास : आज दिवस खूप छान जाईल त्यामुळे मन प्रसन्न राहणार आहे पण भावनांवर नियंत्रण ठेवा तुमच्या भावनांचा गैरफायदा सहज कोणीतरी उठवून जातं त्यामुळे थेट आणि स्पष्ट रहा
धनु रास : धनु राशीसाठी देखील आजचा दिवस चांगला आहे आज तुमची स्तुती होणार आहे त्याचबरोबर तुमच्या नेतृत्वाची देखील परीक्षा होणार आहे त्यामुळे तयार राहा वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल
मकर रास : आज तब्येतीच्या तक्रारी जाणवणार आहेत बऱ्याच दिवसापासून जी दगदग करत आहात आज मात्र थोडी विश्रांती घ्या मानसिक त्रास हळूहळू कमी होणार आहे सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा
कुंभ रास : आज कुंभ राशीसाठी खूप चांगला दिवस आहे विनाकारण आनंदी असाल त्यामुळे कोणतेही दुःख तुम्हाला नाराज करू शकणार नाही संकटावर मात करायला शिकाल कुटुंबाला आधार द्याल
मीन राशि : मीन राशीसाठी आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा आहे आज विशेष करून कुटुंबासोबतच दिवस घालवाल प्रेम संबंधांविषयी कुटुंबाकडे शब्द टाकू शकता त्यांचे उत्तर आज सकारात्मक मिळण्याची शक्यता आहे