“जिन पुरुषों का महिलाओ को देखकर मन मचलता था उन्होंने ही महिलाओं को हिजाब डालने के लिए मजबूर किया !” ; हरियाणाचे मंत्री अनिल वीज यांचे ट्विट

353 0

कर्नाटक : हिजाब प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये आता तीन न्यायाधीशांच्या खंडपीठांसमोर सुनावणी होणार आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावर कर्नाटक सरकारने बंदी घातली. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावर बंदी असावी की नसावी या मुद्यावर दोन्ही न्यायाधीशांचं एकमत होऊ शकलं नाही, आणि त्यामुळे आता हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आलं आहे.

दरम्यान या प्रकरणावर आता हरियाणाचे मंत्री अनिल वीज यांनी एक ट्विट केले आहे या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की , ” जिन पुरुषों का महिलाओ को देखकर मन मचलता था उन्होंने ही महिलाओं को हिजाब डालने के लिए मजबूर किया । आवश्यकता तो अपने मन को मजबूत करने की थी परंतु सजा महिलाओं को दी गई उनको सिर से लेकर पांव तक डाक दिया। यह सरासर नाइंसाफी है । पुरुष अपना मन मजबूत करे और महिलाओ को हिजाब से मुक्ति दें ”

दरम्यान यापूर्वी देखील अनिल वीज यांनी हिजाब प्रकरणावर वक्तव्य केले आहे. हिजाबला विरोध नाही मात्र शाळा, महाविद्यालयामध्ये गणवेशाबाबतच्या नियमांचे पालन केलं पाहिजे. विद्यार्थिनी हिजाब परिधान करत असतील त्यावर आक्षेप नाही. मात्र त्या शाळा महाविद्यालयात जात असतील तर त्यांना शैक्षणिक संस्थांच्या गणवेशांचे नियम पाळले पाहिजेत. जर त्यांना गणवेशांच्या नियमांचे पालन करायचं नसेल तर त्यांनी घरी राहावं. असं देखील वीज यांनी विधान केलेले आहे.

Share This News
error: Content is protected !!