बीभत्स : केरळमध्ये नरबळी; 2 महिलांच्या शरीराचे केले तुकडे; हत्या केल्यानंतर एवढ्यावरच थांबला नाही तर…

690 0

केरळ : आजच्या भारत देशामध्ये अशा घटना म्हणजे भारतीयांच्या भुवया उंचावण्यासारख्याच आहेत. केरळमध्ये झालेल्या या हत्याकांडाने देखील देशाचे लक्ष वेधले आहे. या भयंकर हत्याकांडाने संताप व्यक्त केला जात असून, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

या हत्याकांडातील खुनी हा महिलांचा फेसबुकच्या माध्यमातून शोध घेत होता. आर्थिक विवंचनेत अडकलेल्या महिलांना हेरून तो आपला डाव साधत होता. या महिलांना क्रूरतेने मारून त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. त्यानंतर हे तूकडे जमिनीत पुरण्यात देखील आले. पण यावरच हा विकृत आरोपी थांबला नाही, तर त्यानी त्यातले काही तुकडे शिजवून खाल्ल्याचा देखील धक्कादाय प्रकार पोलिसांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितला आहे.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार याची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली आहे. त्यातूनच हा आरोपी विकृत असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. मुख्य आरोपी शफी याबाबत पोलीस आयुक्त नागराजू यांनी अनेक धक्कादायक खुलासे देखील केले आहे.

या प्रकरणांमध्ये शफी हा मुख्य सूत्रधार असून त्यासोबत आणखी कोणी आरोपी आहेत का? याचा अधिक तपास सुरू आहे. त्यासह या महिलांचे लैंगिक शोषण करण्यात आले होते का याचा देखील कसून तपास सुरू आहे. त्यातूनच आणखी काही धक्कादायक खुलासे देखील होण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Share This News
error: Content is protected !!