…अन्यथा शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही – संभाजी ब्रिगेड

726 0

पुणे : 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या धोरणाला विरोध करणारी निवेदने राज्यभरातून मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना देण्यात आली. 0 ते 20 विद्यार्थी संख्या असलेल्या राज्यातील शाळा बाबत माहिती जमा करण्यात येत आहे. व त्यांचे समायोजन म्हणजेच त्या शाळा बंद करण्याचं धोरण राज्य सरकार पुन्हा एकदा राबवणार असल्याची सुतोवाच स्वतः शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

याचा सर्वात मोठा व दीर्घकालीन फटका ग्रामीण भागातील वंचित, दुर्बल व आदिवासी घटकांना आणि मुख्यत्वे मुलींना बसेल अशी स्थिती आहे.या सामाजिक संस्था आक्रमक झाले आहेत. या सरकारच्या निर्णयाचा संभाजी ब्रिगेड ने पण विरोध केला आहे हा.

निर्णय त्वरित मागे घ्यावा,अन्यथा शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही. असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिला आहे.

Share This News
error: Content is protected !!