शिंदे गटासाठी महत्त्वाचा दिवस : शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर तीन चिन्हांचा पर्याय सादर

566 0

मुंबई : काल उद्धव ठाकरे यांच्या गटाला नाव आणि पक्षाचिन्ह निवडणूक आयोगाने निश्चित केले. तर शिंदे गटाला देखील नाव मिळाले. मात्र पक्ष चिन्हासाठी शिंदे गटाकडून पर्याय मागवण्यात आले होते. दरम्यान शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर तीन चिन्हांचा पर्याय सादर करण्यात आला असून, ईमेलवरून शिंदे गटाने तीन पर्याय सादर केले असल्याचे समजते आहे. या तीन पर्यायांपैकी शंख, तुतारी आणि रिक्षा हे तीन चिन्ह शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर ठेवले आहेत.

See the source image

निवडणूक आयोग आज शिंदे गटासाठी पक्ष चिन्ह निश्चित करण्याची दाट शक्यता आहे. शिंदे गटाने शंख, तुतारी यासह रिक्षा हा देखील पर्याय दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मूळ रिक्षाचालक असल्याकारणाने रिक्षा या चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे करावी असे लोक मत होते. अशी देखील सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असताना शिंदे गटाने देखील रिक्षा हे चिन्ह सादर केला आहे.

शिंदे गटाने दोन मेल आयडी द्वारे ३-३ पर्याय सुचवले असून यामध्ये पहिल्या मेल आयडी मधून शंख, सुतारी आणि रिक्षा ही तीन चिन्हे निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आली असून, दुसऱ्या मेल आयडी द्वारे पाठवण्यात आलेल्या चिन्हांमध्ये ढाल-तलवार, तळपता सूर्य आणि पिंपळाचे झाड हे तीन चिन्ह आयोगासमोर ठेवण्यात आले आहेत. लवकरच आता शिंदे गटाला कोणते पक्ष चिन्ह मिळते हे स्पष्ट होऊ शकते.

Share This News
error: Content is protected !!