भन्नाट ! बऱ्याच दिवसनंतर काहीतरी चांगलं पाहायला मिळणार ; कत्रिनाच्या ‘फोनभूत’ चित्रपटाच्या ट्रेलरची जोरदार चर्चा

320 0

मुंबई : गेली अनेक दिवस बॉलीवूडवर एक मरगळ आली आहे. प्रेक्षकांना चांगलं असं काही पाहायला मिळतच नाही, किंवा एखादा ट्रेलर पाहून हा चित्रपट नक्की पाहायला जावं असं देखील वाटत नाहीये. पण तुम्हाला देखील असं वाटत असेल तर फोनभूत हा चित्रपट कदाचित तुम्हाला काहीतरी निखळ आनंद देण्याचा प्रयत्न करण्यात यशस्वी ठरेल असं वाटत आहे.

हॉरर आणि कॉमेडीचा असा जबरदस्त तडका आहे, की पहिल्या क्षणाला तुम्हाला वाटेल हा प्रचंड हॉरर चित्रपट आहे … आणि नंतर याचे बरेचसे सीन्स पाहून तुम्ही पोट धरून हसाल…! महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच दिवसानंतर कत्रिनाचा सुंदर अंदाज देखील पाहायला मिळणार आहे. कत्रिनासारखी सारखी सुंदर भूत जर का यामध्ये असेल तर मग भन्नाटच ना…!

See the source image

कत्रिना सोबत या चित्रपटांमध्ये असणार आहेत सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यासह जॅकी श्रॉफची देखील एक प्रमुख भूमिका या चित्रपटांमध्ये असणार आहे. एकंदरीत ट्रेलर मधून चित्रपटाची बेसलाईन काय असावी हे लक्षात येते, पण तरीही हा चित्रपट पहावा अशी एक इच्छा मनामध्ये नक्की निर्माण होईल. चला तर मग या चित्रपटाचा ट्रेलर पाहूयात…

https://youtu.be/07p5GcVkhIc

या चित्रपटाला अवघ्या काही तासांत 11 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 90 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!