डब्यात रोज पोळी भाजी खाऊन मुलं कंटाळलेत ? अगदी पाच मिनिटात बनणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा

553 0

घरी भरून येणारी प्रत्येक गोष्ट ही गृहिणीला खूप आवडत असते. जसे की बाजारातून घरी येताना वेगवेगळ्या भाज्या, किराण्याच्या दुकानातून येणा-या पिशव्या भरून किराणा, आता ही गोष्ट खरंतर एक गृहिणीच जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकते, की घर भरलेलं असणं तिला किती पसंत असतं. पण एक गोष्ट तिला कधीच आवडत नसते ती म्हणजे लहान मुलांचा न खाल्लेला भरलेला डबा परत येणे. पण मुलांचही कुठेतरी बरोबरच असतं ,रोजच पोळी भाजीचा डबा खाऊन कंटाळून जातात. मग आज एक अशी हलकीफुलकी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे, जी तुम्हाला बनवण्यासाठी अगदी पाच मिनिटेच वेळ लागणार आणि मुलांना ती जाम आवडणार सुद्धा…

चला तर मग पाहूयात आजची रेसिपी ‘ब्राऊन ब्रेड पिझ्झा’

ब्रेडच्या रेसिपीज या खरंतर चांगल्या नसतात, पण या रेसिपीमध्ये तुम्हाला ब्राऊन ब्रेड वापरायचा आहे हे लक्षात ठेवा. आता सर्वात प्रथम तव्यावर चांगले तूप घाला आणि या तुपावर या ब्राऊन ब्रेडची एक बाजू छान भाजून घ्या. तो पर्यंत एका बाजूला कांदा, शिमला मिरची, टोमॅटो या भाज्या अगदी बारीक छान चिरून घ्या.

ब्राऊन ब्रेडची एक बाजू हलकी भाजून झाल्यानंतर ती बाजू वर करा, आणि गॅस बारीक ठेवायचा आहे. आता यावर या सर्व भाज्या बारीक चिरलेल्या पिझ्झा टॉपिंग सारख्या घाला. त्यावर वरतूनच पटकन मीठ आणि चाट मसाला भुरभुरून टाका. यावरून आता चीज किसून घाला. भाज्यांचा संपूर्ण चीज मध्ये लपून बसतील एवढे चीज किसून यावर घाला. आणि झाकण ठेवून छान वाफ काढा. तुमचा ब्राऊन ब्रेड पिझ्झा तयार आहे.

ही रेसिपी तुम्ही या आधी बऱ्याच वेळा अगदी सहज घरी केली देखील असेल, पण मुलांना काहीतरी वेगळं चमचमीत आणि आकर्षक दिसणारं हवं असतं. मग जेव्हा तुम्ही याला ब्राऊन ब्रेड पिझ्झा असं म्हणाल ,त्या वेळेस मुलं देखील आनंदाने ते खातील आणि पोटात पौष्टिक भाज्या देखील जातील. झाला की नाही अगदी पाच मिनिटात ब्राऊन ब्रेड पिझ्झा तयार…! चला तर मग उद्याच्या डब्यामध्ये मुलांसाठी हा तयार करून मुलांना हा कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

Share This News
error: Content is protected !!