CM EKNATH SHINDE

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आळंदीमध्ये मृदुंग दिंडीमध्ये होणार सहभागी

412 0

आळंदी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज आळंदी दौरा आहे. आळंदी मधील मृदुंग ज्ञान गुरुकुल शिक्षण संस्था यांच्या वतीने आयोजित पंडित दासोपंत स्वामी आळंदीकर भव्य संगीत महोत्सवामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यंदा या महोत्सवाचे 27 वे वर्ष असून या महोत्सवातील मृदुंग दिंडीमध्ये आज दुपारी एक वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आळंदी मध्ये एकनाथ शिंदे प्रथमच येत आहेत.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!