काय सांगता आज पाणी येणार नाही ? पुणे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवलीच नाही…!

322 0

पुणे : गुरुवारी पाणी येणार नाही याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची योग्य ती खबरदारी पुणे मनपाने घेतली नसल्यामुळे पुणेकरांना कोणतीच पूर्वतयारी करता आली नाही. त्यामुळे आज पाणी आले नसल्या कारणाने नागरिकांना मनस्ताप व हाल सोसण्याची वेळ आली आहे. या प्रकरणी त्वरित चौकशी करून योग्य ती कारवाई करावी व अशा अघोषित पाणी बंद पासून पुणेकरांची सुटका करावी अशी मागणी राष्ट्रवादी अर्बन सेल पुणे शहरच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत पुणे मनपा नेहमीच्या पद्धतीने प्रेस नोट काढून वृत्तपत्राद्वारे आधीच नागरिकांना कल्पना देण्यात येत असते. परंतु प्रसारमाध्यमांपर्यंतच प्रेस नोट योग्य पोहोचली नाही, त्यामुळे आजचा पाणीपुरवठा बंद हा नागरिकांसाठी “गुपित” च राहिला. त्यात ज्या भागाचा पाणीपुरवठा बंद असणार आहे ती माहिती सुद्धा अर्धवटच छापण्यात आली होती.

धरणात एवढे पाणी असताना पुणेकरांना पाण्यासाठी वण-वण का ! हाच प्रश्न नागरिकांना कडून विचारला जात आहे..पुणे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या या गचाळ कारभारामुळे पुन्हा एकदा नागरिकांना मनस्ताप व हाल सोसण्याची वेळ आलेली आहे.

Share This News
error: Content is protected !!