अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण

534 0

पुणे- भारताच्या त्र्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले.

कोरोनाचे सर्व नियम पाळून अत्यंत साध्या पद्धतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या वेळी पुणे पोलीस दलातील प्रकाश चौधरी,पांडुरंग वांजळे, विजय भोंग इत्यादी पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस पदक जाहीर झाल्याबद्दल अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्रातील 51 पोलीस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल त्याचबरोबर सायरस पूनावाला, सुलोचना चव्हाण यांच्यासह अन्य व्यक्तींना पद्मविभूषण पद्मश्री मिळाल्याबद्दल अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Share This News
error: Content is protected !!