बापरे…! अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ ; रावण दहन झाल्यानंतर पेटता पुतळा पडला नागरिकांच्या अंगावर

531 0

हरियाणा : दसरा भारतभरामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी रावणाचे मोठमोठे पुतळे दहन करण्याची प्रथा आहे. रावण दहनाचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील करत असतात. रावण दहन झाल्यानंतर आनंद उत्सव देखील साजरा केला जातो. प्रभू श्रीरामाने ज्या पद्धतीने रावणाचा अंत केला तशाच पद्धतीने प्रभू श्रीरामाची वेशभूषा करून अग्निबाणाने रावण दहन करण्यात येते. पण हरियाणामध्ये घडलेल्या या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

हरियाणाच्या यमुनानगर भागामध्ये रावण दहन करण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी आनंदोत्सव साजरा करत असतानाच हा रावणाचा पेटता पुतळा या नागरिकांच्या अंगावर पडल्याचं एका व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येते आहे.

त्यानंतर अचानकपणे जमिनीवर मोठ्या प्रमाणावर फटाके देखील फुटताना आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. या दुर्घटनेमध्ये नेमके किती नागरिक जखमी झाले आहेत हे समजू शकलो नाही. ANI ने हा व्हिडिओ ट्विट केला आहे.

Share This News
error: Content is protected !!