आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

405 0

शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज. प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर व तेल केवळ शंभर रुपयांत देणार.

आपत्ती व्यवस्थापन प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमणार

पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देणार

नागपूरमेट्रोरेल्वे प्रकल्पास गती मिळणार. सुधारित खर्चास मान्यता.

भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देणार. योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता.

उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या खर्चास सुधारित मान्यता. ८ दुष्काळी तालुक्यांना फायदा

Share This News
error: Content is protected !!