क्रूरतेचा कळस : पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागातून पत्नीसह पोटच्या दोन मुलींना जिवंत जाळले ; परिसरात संतापाची लाट

610 0

डोंबिवली : माणसाचा राग दुसऱ्याला कमी आणि स्वतःलाच जास्त उध्वस्त करत असतो. या निष्ठूर बापान संतापाच्या भरात आपलं संपूर्ण कुटुंब उध्वस्त करून टाकल आहे. डोंबिवलीमध्ये घडलेल्या या घटनेने संतापाची लाट उसळली आहे.

डोंबिवलीमध्ये राहणारा प्रसाद पाटील याचे आणि त्याच्या पत्नीचे नेहमीच वाद होत असत. प्रसाद आपल्या पत्नीला मानसिक आणि शारीरिक त्रास देतच होता. पण त्या दिवशी मात्र त्याचा संताप पत्नीला मारहाण करूनच शांत नाही झाला, तर त्याने पत्नीच्या अंगावर आणि पोटच्या दोन मुलींच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना आगीच्या हवाली केलं.

या प्रचंड निर्दयी घटनेन परिसरात संतापाची लाट उसळली आहे. प्रसाद पाटील एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन घराला आग लागली असून त्यामध्ये दोन मुली आणि पत्नी जखमी झाली असल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून त्याच्या संशयास्पद हालचाली सुटल्या नाहीत. आणि अधिक तपासानंतर बापानेच स्वतःचे कुटुंब रागाच्या भरात उध्वस्त केल्याचं निष्पन्न झालं. दुर्दैवी म्हणजे या घटनेमध्ये त्याची पत्नी आणि दोन मुलींचा मृत्यू झाला. आरोपी पित्यावर कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!