पुणेकरांसाठी महत्वाची सूचना ! चांदणी चौकाला जोडणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

413 0

पुणे : प्रचंड गाजावाजा झालेला चांदणी चौकातला पूल अखेर पाडण्यात आला. सहाशे किलो स्फोटकं वापरून रविवारी मध्यरात्री नियंत्रित स्फोटाद्वारे मध्यरात्री 2.23 वाजता हा पूल पाडण्यात आला. वाहतुकीस अडथळा होत असल्याचं कारण देत हा पूल जमीनदोस्त करण्यात आला मात्र आज दुपारी पुन्हा वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळालं.

https://youtu.be/0wicgqwXlP8

पुलाच्या बाजूचा खडक फोडण्याचे काम बाकी असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक 20 मिनिटे बंद केली जाणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं असलं तरी तब्बल दीड तासाहून अधिक वेळ परिसरात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.

पूल पाडल्यानंतरही वाहतूक कोंडी होत असेल तर नेमकं काय साध्य झालं असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!