दसऱ्याला कुलदेवीची अशी भरा ओटी ! योग्य पद्धत आणि धर्मीकी महत्व

809 0

दसऱ्याच्या दिवशी कुलदेवीची ओटी भरण्याची प्रथा अनेक घरांमध्ये असतेच. देवीची ओटी भरत असताना काही महत्त्वाच्या बाबी नेहमी लक्षात ठेवाव्यात ज्यामुळे आपल्या घराला देवीचा आशीर्वाद नक्की मिळतो.

१. देवीची ओटी भरताना तिला नेसवण्याची साडी ही नेहमी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता असते.
२.दोन्हीही हातांच्या ओंजळीमध्ये साडी त्यावर खण आणि नारळ ठेवून आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे नारळाची शेंडी देवीच्या दिशेने करावी
३. खड साडी आणि नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावीत आणि त्यानंतर तांदूळ आणि तिची ओटी भरावी
४. ओटी मध्ये बदाम लेकुरवाळे हळकुंड सुपारी खोबऱ्याचा तुकडा आणि एक रुपयांचे नाणे या पाच वस्तूंसोबत मूठभर तांदूळ घेऊन पाच वेळा साडी आणि खणावर अर्पण करावेत त्यानंतर पुन्हा त्यातील काही तांदूळ आपल्या तामनामध्ये पुन्हा काढून घ्यावेत
५. त्यासह देवीची ओटी भरताना आपल्या इच्छेप्रमाणे देवीला शृंगार देखील अर्पण करू शकता यामध्ये बांगड्या कुंकू मंगळसूत्र जोडवे नथ फुलांची वेणी याने देवीचा शृंगार देखील करू शकता.

Share This News
error: Content is protected !!