एका होता चांदणी चौक पूल : ब्लास्ट केला पण पूर्ण पूल पडलाच नाही ? अधिकारी म्हणतात आमच्या अंदाजापेक्षा…

388 0

पुणे : चांदणी चौकातील वाहतूक कोंडीमुळे पुणेकर अक्षरशः त्रासला होता. गणेशोत्सव काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आले असताना ते देखील या वाहतूक कोंडीमध्ये अडकले पुणेकरांनी मुख्यमंत्र्यांकडे या वाहतुकीच्या कोंडीवर काहीतरी तातडीने मार्ग काढावा अशी मागणी केली. आणि चांदणी चौकाचा श्वास मोकळा होण्यासाठी युद्ध पातळीवर हालचाली सुरू झाल्या. 22 सप्टेंबर रोजी चांदणी चौकातील पूल पाडण्याचे आधी ठरवण्यात आले होते. दरम्यान आज अर्थात दोन ऑक्टोबर रोजी रात्री १ : १५ मी स्फोटके लावून पूल पाडण्यात आला आहे.

ब्लास्ट झाला खरा . पण पूल पूर्णपणे पडलाच नाही. याविषयी आनंद शर्मा यांनी सांगितले कि, आमच्या अंदाजापेक्षा या पुलासाठी जास्त स्टील वापरण्यात आले होते. ( 1992 साली हा पूल बांधणा-या सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाज चुकवला . त्यामुळे पूल पूर्णपणे पडला नाही. आता पोकलेनच्या सहाय्यानं बाकी काम सुरू आहे.

 

Share This News
error: Content is protected !!