पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा सराईतांवर कारवाईचा धडाका कायम ; अजय विटकर आणि टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

269 0

पुणे : पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळक्यांवर मोक्का अंतर्गत 98 कारवाई केली आहे. शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर वचक बसावा आणि शहरांमध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित रहावी या उद्देशाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाईचा जबरदस्त बडगा कायम ठेवला आहे.

दरम्यान चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार अजय विटकर आणि त्याच्या टोळीतील सात जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये या टोळीचा प्रमुख अजय विटकर वय वर्ष 20 ,विजय विटकर वय वर्ष 18, दत्ता धोत्रे वय वर्ष 22 ,सागर धोत्रे वय वर्ष 27, सिद्धार्थ गायकवाड वय वर्ष 23 ,कृष्णा उर्फ तिची माने वय वर्ष 25 ,यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तर यापैकी अतुल धोत्रे वय वर्ष 22 आणि विजय उर्फ चपाती विटकर वय वर्ष 23 हे फरार आहेत. खुनाचा प्रयत्न ,जबरी चोरी, मारामारी ,गंभीर दुखापत ,जीवे मारण्याची धमकी ,बेकायदा शस्त्र बाळगणे ,वाहनांची तोडफोड करून नुकसान करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे या सराईत गुन्हेगारांवर दाखल आहेत.

Share This News
error: Content is protected !!