पुणे : आत्महत्या करणारया इसमाला अग्निशमन दलाकडून जीवदान

372 0

पुणे : काल दिनांक ३०|०९|२०२२ रोजी राञी ११ वाजता सिहंगड रस्ता, वडगाव बुद्रुक, जुन्या पोस्ट ऑफिस जवळ, श्रद्धा अपार्टमेंट येथे एक इसम राहत्या घरात दार बंद करुन आत्महत्येचा प्रयत्न करत असून अग्निशमन दलाची मदत रवाना करण्याबाबत पोलिसांनी दलाच्या नियंत्रण कक्षात कळविले असता तत्परतेने सिहंगड रस्ता, सनसिटी येथील अग्निशमन वाहन तातडीने रवाना करण्यात आले.

घटनास्थळी पोहोचताच अधिकारी व जवानांनी लगेचच पोलिसांकडून माहिती घेत बचावकार्यास सुरवात केली. इमारतीच्या दुसरया मजल्यावर असलेल्या घरामधे सदर इसमाचा ओरडण्याचा आवाज येत हा प्रकार घडत असताना जवानांनी मुख्य लाकडी दरवाजा व लोखंडी दरवाजा याला बोल्ड कटर हे उपकरण वापरत पोलिसांच्या परवानगीने तोडून आतमधे प्रवेश केला.

स्वयंपाक घरामधे सदर इसम पंखा व गळ्यामधे नायलॉनची दोरी अडकवून एका लाकडी स्टुलवर उभा असलेला दिसून आला. तातडीने जवानांनी दोरी तोडत त्याला खाली उतरवून वेळेवर त्याची सुखरुप सुटका करत त्याला जीवदान दिले. सदर ठिकाणी उपस्थित पोलिस यांची मोठी मदत झाली तसेच त्यांच्याकडून माहिती लवकर मिळाल्याने सदर इसमाचे प्राण वाचविण्यात यश आले.

या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्र अग्निशमन अधिकारी प्रभाकर उम्राटकर, चालक संतोष चौरे व फायरमन सतीश डाकवे, संजू चव्हाण व मदतनीस कोकरे यांनी सहभाग घेतला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!