राज्यातील ‘या’ 30 झेडपी अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर ; निवडणुकांचा मार्ग मोकळा

387 0

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य सरकारने लांबणीवर टाकल्या आहेत. महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात राज्य सरकारने अद्याप कोणतेही घोषणा केलेली नाही. तर ग्रामविकास विभागाने 30 सप्टेंबर रोजी राज्यातील 30 झेडपी अध्यक्ष यांचे आरक्षण जाहीर केले. त्यामुळे आगामी काळात निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान राज्यातील सुमारे 30 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ग्रामविकास विभागाने 30 रोजी याबाबतचा शासकीय निर्णय जाहीर केला. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग तर पुणे झेडपीचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे झेडपीच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठाणे : सर्वसाधारण , पालघर : अनुसूचित जमाती , रायगड : सर्वसाधारण, रत्नागिरी : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सिंधुदुर्ग : सर्वसाधारण, नाशिक : सर्वसाधारण (महिला), धुळे : सर्वसाधारण (महिला), जळगाव : सर्वसाधारण, नगर : अनुसूचित जमाती, नंदुरबार : अनुसूचित जमाती (महिला), नाशिक : सर्वसाधारण (महिला), धुळे : सर्वसाधारण (महिला), जळगाव : सर्वसाधारण, नगर : अनुसूचित जमाती, नंदुरबार : अनुसूचित जमाती (महिला), औरंगाबाद : सर्वसाधारण, बीड : अनुसूचित जाती, नांदेड : नागरिकांचा मागास प्रवर्ग, उस्मानाबाद : सर्वसाधारण (महिला), परभणी : अनुसूचित जाती, जालना : नागरिकांचा मागास प्रवर्ग, लातूर : सर्वसाधारण( महिला), हिंगोली : सर्वसाधारण (महिला), अमरावती : सर्वसाधारण (महिला), अकोला : सर्वसाधारण (महिला), यवतमाळ : सर्वसाधारण, बुलढणा : सर्वासाधारण, वाशिम : सर्वसाधारण, नागपूर अनुसूचित जमाती, वर्धा : अनुसूचित जाती (महिला), चंद्रपूर :अनुसूचित जाती (महिला), भंडारा : अनुसूचित जमाती (महिला), गोंदिया : नागरिकांचा मागास प्रवर्ग, गडचिरोली : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

Share This News
error: Content is protected !!