SPECIAL REPORT : महाराष्ट्रात या वर्षी होणार 4 दसरा मेळावे ; कोणते ते पाहा..

277 0

SPECIAL REPORT : राज्यात शिवसेना आणि शिंदेगटात दसरा मेळाव्यावरून घमासान पाहायला मिळाल्यानंतर अखेर मुंबई उच्च न्यायालयानं उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. मात्र तुम्हाला माहीत आहे यावर्षी राज्यात तब्बल 4 दसरा मेळावा होणार आहेत नेमके कोणते 4 होणार दसरा मेळावे हे सांगणारा TOP NEWS मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट

उध्दव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा BKC मैदानात होणार आहे. तर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा श्री भगवानबाबांचे जन्मगाव असलेल्या श्री क्षेत्र सुपे सावरगाव (घाट) येथे होणार आहे. मात्र या बरोबरच करुणा धनंजय मुंडे यांनी देखील दसरा मेळावा घेण्याची तयारी दर्शविली असून मी पण वंजारी समाजाची सून आहे. त्यामुळे मला दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे. यामुळे मी भगवानगडावर दसरा मेळावा घेणारच, अशी भूमिका करूणा मुंडेंनी घेतली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!