सिंहगड रोड परिसरात पुन्हा एकदा थरार ; टोळक्याकडून एकाचा खून

482 0

पुणे : सिंहगड रोड परिसरातील न-हे येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने या व्यक्तीला जबर मारहाण केली. या घटनेची माहिती पोलिसांना उशिरा मिळाली. तोपर्यंत ही व्यक्ती तिथेच जखमी अवस्थेत पडून होती. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीस ससून रुग्णालयामध्ये दाखल केले. परंतु उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील राधाकिसन नलावडे वय वर्ष 54 असं या मारहाणी मध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. नलावडे हे कॅम्प भागामध्ये झेरॉक्स मशीन दुरुस्तीचे काम करत होते. आर्थिक व्यवहारातून ही मारहाण झाली असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी पाच ते सहा जणांच्या टोळक्याने नलावडे यांना चार चाकी गाडी मधून आणले. न-हे येथील अभिनव कॉलेज रोडवरील विश्व रेसिडेन्सी जवळ आणल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी जबर मारहाण करण्यात आली. या विषयी सुदाम नलावडे यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

Share This News
error: Content is protected !!