नंदुरबारमध्ये पोलीस अधीक्षकांनी केला स्त्री शक्तीचा अनोखा सन्मान

294 0

नंदुरबार : नंदुरबार शहरातील खोडाई माता मंदिर परिसरामध्ये यात्रा उत्सव दरम्यान उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीचे उद्घाटन करण्याचा मान जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अंमलदार सविता तडवी यांना देऊन नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्त्री शक्तीचा सन्मान हा कौतुकाचा विषय ठरला.

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी साध्या वेशातील पोलीस अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले आहे. गर्दीच्या ठिकाणी मुलींची किंवा महिलांची छेड करण्याचे प्रकार अशा सण उत्सव काळात घडत असतात. हे प्रकार टाळण्याच्या उद्देशाने महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस अंमलदार यांची दामिनी पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच मंदिर आणि यात्रोत्सवाच्या दरम्यान गर्दीच्या ठिकाणी महिलांचे मौल्यवान दागिन्यांची चोरी होऊ नये म्हणून विशेष पथके देखील तयार करण्यात आली असल्याचे समजते. त्याचबरोबर वयोवृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींची गैरसोय टाळण्यासाठी उन्हापासून संरक्षणासाठी स्वतंत्र मंडप आणि खुर्चीची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी पोलीस चौकीच्या उद्घाटनाचा मान एका दुर्गेला दिला हा स्त्री शक्तीचा सन्मानच आहे. त्याबद्दल पोलीस अधीक्षकपी.आर. पाटील यांचे सर्व स्तरातून विशेष कौतुक करण्यात येत आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide