CRIME NEWS : नवरा बायकोच्या भांडणात मेव्हण्यावर जीवघेणा हल्ला ; हल्लेखोरांकडून हवेत गोळीबार ? मालेगावात थरार…

339 0

मालेगाव : मालेगावमध्ये घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मालेगावातील सर्वे नंबर 55 च्या निहाल नगर भागामध्ये सरताज सत्तार शेख यांच्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला. ही घटना घडते वेळी बघ्यांची एकच गर्दी जमली. तर हल्लेखोरांनी हा जमाव पांगवण्यासाठी गोळीबार केला असल्याचे देखील म्हटले जात आहे.

अधिक वाचा : “पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना भारतात राहण्याचा कोणताही अधिकार नाही” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दरम्यान या हल्लेखोरांनी हवेत गोळीबार केला की नाही याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार , नवरा-बायकोचे भांडण झाले. यामध्ये संतापलेल्या नवऱ्याने बायकोच्या भावावरच जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून अधिक तपास मालेगाव पोलीस करत आहेत.

अधिक वाचा : केसरी टूर्सला ग्राहक न्यायालयाचा दणका ; सहलीसाठी भरलेले 55 हजार शुल्क व्याज व नुकसान भरपाई सहित देण्याचे आदेश

Share This News
error: Content is protected !!