“पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना भारतात राहण्याचा कोणताही अधिकार नाही” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

313 0

नाशिक : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया पीएफआय (PFI) या संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली आहे. पुढच्या पाच वर्षांसाठी पीएफआयवर भारतामध्ये बंदी घालण्यात आली असून या बंदीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थन केले आहे.

या बंदी विषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, “पीएफआय या संघटनेवर घातलेली बंदी ही योग्यच आहे. शिवाय पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना भारतात राहण्याचा कोणताही अधिकार नाही.” असे परखड मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले.

त्यासह केंद्रातील आणि राज्यातील गृह खात योग्य प्रकारे काम करते आहे. राष्ट्रविरोधी विचार पसरवणाऱ्यांची अजिबात हयगय केली जाणार नाही. तसेच जे लोक राष्ट्रविरोधी विचार पसरवून पाहत असतील अशांवर कठोर कारवाई करण्यात येईल, ” असा इशाराही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

Share This News
error: Content is protected !!