धक्कादायक : हा व्हिडिओ पाहिल्यावर अंगावर काटा येईल ; स्कूलबस ड्रायव्हरला त्या प्रकारानंतर केले निलंबित

478 0

शाळेत बसने किंवा व्हॅनने जाणाऱ्या लहान मुलांच्या बाबत आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अपहरण ,शारीरिक अत्याचार ,अपघात ,आग लागणे अशा घटनांमुळे अनेक चिमुरड्यांचा जीव देखील गेलेला आहे. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना बसने किंवा व्हॅनने शाळेत पाठवताना विशेष काळजी घेतात.

पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या मनामध्ये शंकेची पाल नक्कीच चुकचुकेल. अपघात हे सांगून आणि मुद्दामहून होत नाहीत हे जरी खरे असले तरीही , या व्हिडिओमधील या महिला स्कूलबस चालकाची मोठी चूक देखील आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक चिमुकली बस मधून खाली उतरते आहे. आणि त्यानंतर बसचा दरवाजा हळूहळू बंद होत.

पण या मुलीची स्कूल बॅग या दारामध्ये अडकते आणि बस चालू देखील होते. गंभीर बाब म्हणजे या स्कूलबस चालकाला ती चिमुकली बसच्या दारामध्ये अडकली असून फरपटत आहे, ही बाब बऱ्याच वेळ लक्षात आलं नाही. सुमारे एक हजार फूट फरपटत गेल्यानंतर ड्रायव्हरचे लक्ष या बाबीकडे गेले आणि त्यानंतर तिने बस थांबवली. या महिला बस चालकाला निलंबित करण्यात आल्याचे समजते. हि मुलगी या भयावह घटनेतून सुखरूप वाचली हे सुदैव म्हणावे लागेल .

Share This News
error: Content is protected !!