गुलाम नबी आझाद यांची मोठी घोषणा ; नव्या पक्षाबाबत म्हणाले …

292 0

” या पक्षात कुठलाही भेदभाव नसेल. पक्षावर कुठल्याही धर्माचा अथवा जातीचा प्रभाव नसेल. सर्व धर्मीयांना या पक्षात प्रवेश करण्याची मुभा असेल… ! ” असे म्हणून आज गुलाम नबी आझाद यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे.

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. दरम्यान तीन रंगाच्या धर्मनिरपेक्ष ध्वजाचेही आझाद यांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आले. देशभरातून कार्यकर्त्यांकडून पक्षासाठी दीड हजार नाव सुचवण्यात आली होती. यामध्ये उर्दू आणि संस्कृत नावाचा देखील समावेश होता. त्यात सर्वांना समजेल असे नाव आम्हाला ठेवायचे होते. त्यानुसार गुलाम नबी आझाद यांच्या नवीन पक्षाचे नाव ‘डेमोक्रॅटिक आझाद पार्टी’ असे ठेवण्यात आले आहे.

2005 ते 2008 हा गुलाम-नबी आझाद यांचा जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून भूषवलेला कार्यकाळ आहे. तर 26 ऑगस्ट रोजी त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्य सर्व पदांचा राजीनामा दिला होता. आज त्यांनी आपल्या नवीन पक्षाची स्थापना केली आहे.

Share This News
error: Content is protected !!