“माझं विधान मराठा समाजाला खटकलं असेल तर मी मराठा समाजाची माफी मागतो…!” – आरोग्य मंत्री तानाजी सावंत

424 0

पुणे : काल एका जाहीर सभेत आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले, कि या सरकारच्या काळात मराठा आरक्षण मिळणारच, पण मराठा आरक्षणाचा विषय आत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना आपण ओळखले पाहिजे. इतके दिवस ते गप्प का होते ? त्यांना आत्ताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का निर्माण झाली ? असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप करत टोला लगावला.

त्यावर “आमच्या ग्रामीण भागातील चर्चे बाबत चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. बोलण्याच्या अघोत बोलून जातो. त्याचा अर्थ कुठे तरी मराठी समजाच्या भावना दुखवाव्यात. त्यावर कुठे तरी राजकीय ताशेरे मारावेत.या पठडीतला मी मुळीच नाही.हे तुम्ही आतापर्यंत सर्वांनी पाहिले आहे.त्यामुळे माझ्या बोलण्यामुळे किंवा वक्तव्यामुळे माझ्या समजाच्या जर भावना दुखावल्या गेल्या असतील.तर माझं विधान मराठा समाजाला खटकलं असेल तर मी मराठा समाजाची माफी मागतो.” असे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे पुण्यात पत्रकारांशी बातचीत करताना म्हणाले.

तसेच “मराठा समाजातील मुला-मुलींना त्यांच्या करिअर करीता आरक्षणाची गरज आहे. आमचा समाज मागासलेला आहे. तसेच ज्या कोणी ते वक्तव्य दाखवले. पण जवळपास एक तासाच भाषण आहे. मी तासभर बोलो आहे. मराठा क्रांती मोर्चामध्ये काम करणारा माणूस मंत्रिपदावर आहे. हे आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. माझ्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत मराठा आरक्षण मिळाले नाही. तर मी राजीनामा देईल. या भाषेत मी बोललो आहे. पण पहिल मी माझ्या मराठा समाजा सोबत राहणार आहे. असे तानाजी सावंत म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!