शारदीय नवरात्र प्रारंभ , वाचा महत्व , पूजा विधी , धार्मिक मान्यता

493 0

घटस्थापना महत्व : हिंदू धर्मातील शारदीय नवरात्रोत्सवात घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतांनुसार कलश हे देवता, ग्रह आणि नक्षत्रांचे निवासस्थान मानले जाते. कलश हे सुख-समृद्धी आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते. कलशालाच घट देखील म्हटले जाते. नवरात्रीमध्येही कलशाची स्थापना करून सर्व दैवी शक्तींचे आवाहन केले जाते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

आश्विन शुद्ध प्रतिपदा या तिथीला देवीच्या घटांची स्थापना केली जाते. आज पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. आणि नवमी तिथी म्हणजे 05 ऑक्टोबर 2022 पर्यंत साजरी केली जाणार आहे.

नवरात्रीच्या काळात भक्त दुर्गा देवीची पूजा करतात आणि पूर्ण भक्तिभावाने उपवास करतात. काही लोक संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात. नवरात्रीत घरोघरी घटस्थापना केली जाते. जाणून घेऊया नवरात्रीच्या दिवशी घटस्थापनेचा मुहूर्त आणि पूजा विधी

See the source image

घटस्थापना पूजा विधी
सर्वप्रथम मातीचे भांडे घ्या. त्यात तीन थरांमध्ये माती घाला आणि 9 प्रकारचे धान्य मातीत टाका आणि त्यात थोडे पाणी घाला.
आता एक कलश घ्या. त्यावर स्वस्तिक बनवा. मग मौली किंवा कलावा बांधून ठेवा. यानंतर कलश गंगाजल आणि स्वच्छ पाण्याने भरा.
त्यात एक पूर्ण सुपारी, फुलं आणि दुर्वा घाला. तसेच अत्तर, पंचरत्न आणि नाणे देखील टाका.
कलशाच्या आत आंब्याची पाने लावा. कलशच्या झाकणावर तांदूळ ठेवा.
देवीचे स्मरण करताना कलशाचे झाकण लावा. आता एक नारळ घ्या आणि त्यावर कलवा बांधा. कलशवर स्वस्तिक चिन्ह बनवा.
कुंकवाने नारळावर टिळक लावा आणि नारळ कलशावर ठेवा.
दुर्गा देवीच्या स्वागतासाठी हा कलश मंदिरात स्थापन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!