शिवसेनेचे बये दार उघड अभियान; शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविली जाणार मोहीम

231 0

देशात आणि राज्यात आदिशक्तीचा जागर असलेला नवरात्रीचा उत्सव सुरू होत असून विजयादशमीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची ऐतिहासिक सभा ही शिवतीर्थावर होणार आहे.

या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रातील जी साडेतीन पीठ आहेत, त्यात कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची श्री भवानी माता, नाशिक जिल्ह्यातील वणीची सप्तशृंगी माता आणि चांदवड, नांदेडच्या माहूरची रेणुका माता या सर्व ठिकाणी आम्ही देवीची आरती करणार आहोत. त्या त्या ठिकाणी देवीला साकडं घालणार आहोत. या प्रत्येक ठिकाणाहून प्रसाद शिवतीर्थावर सभेच्या ठिकाणी आणला जाणार आहे.

शिवसेना महिला आघाडी, युवाच्या महिला पदाधिकार्‍यांच्या सहकार्याने “बये दार उघड” अशा प्रकारची आम्ही मोहीम हाती घेतलेली आहे. न्यायाचे, सुरक्षेचे, प्रगतीची कवाडे खुली होऊन महिला आणि समाजाच्या हितासाठी सर्व काही मंगल व्हावे अशीच आमची देवीच्या चरणी प्रार्थना आहे. या मोहिमेला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

या सर्व मंदिरांपैकी अनेक ठिकाणाहून महाज्योती घेऊन आम्ही शिवतीर्थावर पोचणार आहोत. तो प्रसाद देवतांचा आणि शिवतीर्थावरती माननीय उद्धव साहेबांना अर्पण करणार आहोत. सर्व महिलांच्या मनातली असुरक्षिततेचे भावना दूर व्हावी. मैत्रीची भावना त्यांचा आत्मविश्वास वाढावा या दृष्टिकोनातून ठिकठिकाणी शिवसेनेच्या वतीने महिलांशी संवाद, पत्रकार परिषदा, काही ठिकाणी शासकीय बैठका अशा प्रकारचा कार्यक्रम या मोहिमेमध्ये घेतला जाणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!