पुण्यात बघतोय रिक्षावाला संघटनेनं विकसित केलं स्वतःचं माय रिक्षा ॲप

2240 0

1 सप्टेंबर 22 पासून परिवहन विभागाने रिक्षा मीटर भाडेवाढ लागू केली. भाडेवाढ लागू केल्या केल्या लगेच रिक्षाचालकांना भाडेवाढ मिळणे अपेक्षित असते/ तो त्यांचा हक्क असतो.

पूर्वी डिजिटल मीटर नसताना सर्वत्र मीटर दरवाढीचा तक्ता RTO प्रसारित करत असे व त्यादिवसापासून रिक्षाचालकांना हक्काची भाडेवाढ मिळत असे. परंतु आता डिजिटल मिटर आल्याने त्या मीटर मध्ये सॉफ्टवेअर बदल करून घ्यावा लागतो. ते कॅलिब्रेशन व मीटर पासिंग करून घेण्यासाठी कमीत कमी 2 दिवस जातात व रिक्षाचालकांचा व्यवसाय बुडतो. तसेच पुणे RTO विभागात रिक्षाचालकांची सव्वा लाखाच्या आसपास असणारी प्रचंड संख्या व तोकड्या संख्येने असणारे मीटर कॅलिब्रेशन/ दुरुस्ती व्यवसायिक व परिवहन विभागाचे अधिकारी यामुळे यंत्रणांवर बराच ताण येतो व सर्व रिक्षांचे मीटर कॅलिब्रेशन होण्यास जवळपास 3 महिने लागतात.

मीटर दरवाढीमुळे दिवसाचे 200 ते 250 रु चे उत्पन्न वाढणार असल्याने रिक्षाचालकांची त्यासाठी झुंबड उडते, व कॅलिब्रेशन व पासिंग साठी काळाबाजार वाढतो.

त्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात कॅलिब्रेशन मुदत संपे पर्यंत RTO तर्फे रिक्षाचे नवीन दराचे टेरिफ कार्ड प्रसारित करण्याची पद्धत आहे. परंतु रिक्षाचालकांशी वैर असल्याप्रमाणे फक्त पुण्याचे RTO अधिकारी अजित शिंदे साहेब टेरिफ कार्ड प्रसारित करण्यास विरोध करतात व त्याचा वापर केल्यास कारवाई करण्याची धमकी देणारे वृत्तनिवेदन प्रसारित करता, ज्यामुळे कॅलिब्रेशन ला झुंबड उडून काळाबाजार होण्यास पोषक वातावरण तयार होते.

आम्ही 6 सप्टेंबर 22 रोजी ही बाब राज्याचे परिवहन आयुक्त मा. अविनाश ढाकणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी त्वरित परिवहन विभागाच्या वेबसाईट वर पुण्यासाठी नवीन टेरिफ कार्ड अपलोड करण्याचे आदेश पुणे RTO यांना दिले, परंतु आजतागायत पुण्याच्या RTO अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत पुण्यासाठी टेरिफ कार्ड प्रसारित केलेलं नाही.

उलट पुणे RTO अधिकारी यांनी 14 सप्टेंबर 22 रोजी, पूर्वी दिलेल्या वृत्त निवेदनावरून घुमजाव करत मोठा शोध लावल्याप्रमाणे आम्ही बारकोड आधारित टेरिफ कार्ड वापरण्यास परवानगी देत असल्याचे फसवे वृत्तनिवेदन काढून आजतागायत बारकोड सहित कुठल्याही प्रकारचे टेरिफ कार्ड प्रसारित केले नाही. यामुळे हजारो रिक्षाचालकांचे दिवसाला 200 ते 250 रु व आजतागायत प्रत्येकी सहा ते सात हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

या सर्व गोष्टीना वैतागून बघतोय रिक्षावाला संघटनेतर्फे आम्ही myrickshawala हे ऍप गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून दिले असून त्यास रिक्षाचालकांचा मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यात आपण मीटर वर दिसणारे अंतर व वेटिंग टाइम टाकल्यास आपल्याला किती रुपये भाडे झाले हे कळते.

https://play.google.com/store/apps/details?id=com.savariindia.myrickshawala

 

Share This News
error: Content is protected !!