“समान सुविधा केंद्र” योजनेपासून विद्यार्थी अनभिज्ञ ; काय आहे योजनेचा खरा उद्देश , वाचा सविस्तर

163 0

पुणे : राज्यातील सर्व महाविद्यालयात मागासवर्गीय मुला मूलींच्या शिष्यवृत्ती,इतर शासनाच्या योजना तसेच युवा संवाद अभियान सुरु करण्यासाठी “समान संधी केंद्र”ची स्थापना करण्यात आली. यामध्ये प्रत्येक काँलेजमध्ये एक प्राध्यापक व सहाय्यक म्हणून काही विद्यार्थी घेउन ती योजना सुरु केली. संकल्पना अतिशय चांगली आहे. फेब्रुवारीत 2022 मध्ये ती योजना आपण गाजावाजा करत सुरु ही केली.

आंबेगाव मध्ये पुणे आणी पिंपरी चिंचवड या परीसरातील सर्व काँलेजच्या प्राचार्याची बैठक बोलवली होती. परंतु प्रतीसाद नव्हता. अजुनही ती का सुरू होत नाही. फक्त कागदावरच का चालवत आहात ? असा सवाल स्टुडंट हेल्पिंग हँडस अध्यक्ष  कुलदीप आंबेकर यांनी उपस्थित केला आहे .

जुनमध्ये याबाबत पत्रव्यवहार केले होते. तीन महीन्यानंतरही अंमलबजावणी का झाली नाही? या योजनाच्या माध्यामातुन शिक्षणास प्रोत्साहित करणे, रोजगार, व्यवसाय व कौशल्य शिक्षण यांचे मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

परंतु सद्या पुणे सारख्या शैक्षणिक माहेरघरात या योजनेची अंमलबजावणी बाबत माहीती घेतली तर याबद्ल काही महत्वाच्या काँलेजच्या प्राचार्यांना माहीतीच नाही. असे अनेक परीपत्रक येतात. कोणकोणते लक्षात ठेवणार असेही काही जण बोलले. विद्यार्थींना तर माहीती असणे दुरची गोष्ट.

प्रशासनांनी महाविद्यालय, विद्यार्थी स्तरावर जणजागृती केली नाही. कोणत्या न कोणत्या कोर्ससचे प्रवेश अर्ज
भरण्याची प्रक्रीया सर्वत्र सातत्यानी सुरु असतात. विद्यार्थीना खाजगी नेटकँफेवर जाणे अर्थिकदृष्टया परवडत नाही. अशावेळा ही या योजनाचा लाभ मिळत नसेल तर काय उपाय?

तातडीने याबदल निर्णय घ्यावा. जे काँलेज अंमलबजावणी करत नाहीत. त्यावर कार्यावाही करावी. आपण काँलेज आवारात सबंधीत योजनेचा जाहिरतीचा बँनर दर्शनीभागात लावावा. विद्यार्थीना ईमेल ,मँसेज द्वारे माहीती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide