दसरा मेळावा शिवतीर्थवर होणार ? मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी

359 0

मुंबई : दसरा मेळावा यावरून शिवसेना आणि शिंदे गटाच्या वतीने अर्ज करण्यात आले होते. एखाद्या मैदानावर सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी देताना पोलीस विभागाचा अभिप्राय घेणे अनिवार्य असतं. दरम्यान शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून आलेल्या अभिप्रायानुसार कोणा एकालाच परवानगी देणं कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण करू शकतो. त्यामुळेच 5 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्हीही अर्जदारांना परवानगी नसल्याचं कळवण्यात आलं.

शिवसेनेने महापालिकेच्या निर्णयाला आव्हान देऊन मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. काल शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ कौन्सिल एस पी चीनोय यांनी बाजू मांडताना म्हटले की ,महापालिकेच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी याचिकेत दुरुस्ती करणे आवश्यक असून, न्यायालयाने तशी परवानगी द्यावी. खंडपीठाने शिवसेनेची मागणी मान्य केली. याप्रकरणी आज यावर सुनावणी होणार आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात निर्णय दिला जाईल.

Share This News
error: Content is protected !!