असंघटित कामगारांना ‘ई-श्रम’ पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन; काय आहे ‘ई-श्रम’ ? लाभ ,प्रक्रिया ; वाचा हि माहिती

512 0

पुणे : केंद्र शासनामार्फत असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने ‘ई-श्रम’ पोर्टल तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यातील असंघटित कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन कामगार उपायुक्त अभय गीते यांनी केले आहे.

See the source image

नोंदणी अंतर्गत असंघटित कामगारांना खाते क्रमांक (युनिव्हर्सल अकाऊंट नंबर) दिला जाणार आहे. ‘ई-श्रम’ कार्ड च्या रुपाने असंघटित कामगारांना ओळख मिळणार आहे. असंघटित कामगार, छोटे व्यापारी, फेरीवाले, टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती इ.ना त्याचा लाभ होणार आहे.

‘ई-श्रम’ पोर्टलवर नोंदणी केल्यावर संबंधितांना दोन लाख रुपयांचा अपघाती विमा मिळणार आहे. तसेच भविष्यातील सरकारी योजनांचाही लाभ मिळू शकणार आहे. या नोंदणी अभियानांतर्गत जास्तीत जास्त असंघटित कामगारांनी नोंदणी करण्याचे आवाहन श्री.गिते यांनी केले आहे.

Share This News
error: Content is protected !!