मुंबई : अॅडव्होकेट प्रवीण चव्हाण यांची विशेष सरकारी वकील म्हणून केलेली नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. प्रवीण चव्हाण यांनी गिरीश महाजन यांना बनावट गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या कायदा आणि न्याय विभागाच्या विभाग अधिकारी वैशाली बोरुडे यांनी एडवोकेट प्रवीण चव्हाण यांची विशेष सरकारी वकील म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली आहे.
गिरीश महाजन यांच्यावर एक गुन्हा नोंद आहे. या प्रकरणातील सरकारी वकील अॅडव्होकेट प्रवीण चव्हाण यांच्यावर गिरीश महाजन यांना बनावट गुन्ह्यांमध्ये अडकवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अॅडव्होकेट प्रवीण चव्हाण यांचे एक स्टिंग ऑपरेशन करून व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला. हाच व्हिडिओ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये दाखवला आणि गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता.
राज्याच्या राज्यपालांच्या आदेशाने बुधवारी आदेश काढण्यात आले. दरम्यान त्यांच्याकडे असलेल्या 19 प्रकरणाचे कामकाज पाहण्यासाठी आता नवीन सरकारी वकील नियुक्त केले जाऊ शकतात.