सावधान : दूध विक्रेत्याचे विक्षिप्त कृत्य पाहून नक्कीच होईल संताप, हा व्हिडिओ बारकाईने पहा… ! ; व्हिडिओ व्हायरल

387 0

रोजच विकृत व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. अशी मानसिकता का होत असावी हा देखील मोठा प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी भाजीवर थुंकणारा आणि भाजीवर लघवी करणारा एक ज्येष्ठ वृद्ध व्हिडिओमध्ये कैद झाला. त्याआधी पाणीपुरीच्या पाण्यामध्ये लघवी करणारा एक पाणीपुरीवाला व्हिडिओमध्ये कैद झाला. आणि आता दुधामध्ये थुंकणारा हा दूध विक्रेता एका व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. हा व्हिडिओ बारकाईने पहा…

https://www.facebook.com/reel/1482202848920436?s=yWDuG2&fs=e

प्रथमदर्शित तरी हा दूध विक्रेता दूध मोठ्या कॅनमधून एका किटलीमध्ये काढताना दिसत आहे. परंतु त्यामध्ये तो थुंकतो देखील आहे. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे हे समजू शकले नाही. परंतु सोशल मीडियावर हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होतो आहे. या व्हिडिओवर युजर्स कमेंट देखील करत आहेत. काही युजर्स म्हणत आहेत की, अशा व्यक्तीला कठोर शिक्षा व्हायला हवी ,तर काही जणांचे म्हणणं आहे की हा दूध विक्रेता थुंकत नसून दुधाचा वास घेत आहे,जेणेकरून दूध चांगले आहे की वाईट हे समजेल.

परंतु प्रथमदर्शी तरी या व्यक्तीच्या हालचाली पाहून तो व्यक्ती या दुधामध्ये थुंकत आहे असेच वाटते आहे. त्यामुळे सोशल मीडियामध्ये संताप व्यक्त केला जातो आहे. एकंदरीतच सातत्याने असे व्हिडिओ व्हायरल होत असताना कोणतेही खाद्यपदार्थ घेताना सावधानता बाळगायला हवी हेच सत्य आहे.

Share This News
error: Content is protected !!