शिवसेनेचे आक्रमक नेते चंद्रकांत खैरे यांचा संताप अनावर ; हातात पायताण घेऊन म्हणाले लोक त्यांना आता जोड्याने…

355 0

मुंबई : शिवसेना आणि शिंदे गटातील वादविवादाने आता रौद्ररूप धारण केले आहे. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. अशातच आता शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले चंद्रकांत खैरे यांनी थेट पायतानच काढून हातात घेतले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान रामदास कदम यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा संताप व्यक्त करत असताना ‘त्यांना लोक आता जोड्याने मारतील’ असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी थेट पायथानच हातात घेऊन दाखवले. तसेच ‘लोक प्रत्यक्षात जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही. कदम यांनी माफी मागितली पाहिजे असे देखील या मुलाखती दरम्यान खैरे म्हणाले आहेत.

 

Share This News
error: Content is protected !!