VIDEO : ‘परवानगी मिळो अथवा न मिळो शिवसेनेचा दसरा मेळावा होणारच’…! – सुषमा अंधारे 

380 0

पुणे : शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाल्यामुळे दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटही पुढे सरसावला आहे. त्यामुळे दरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा कोण घेणार यावर सस्पेन्स निर्माण झाला आहे. मुंबई महापालिकेनं वाद आणि दबाव पाहता निर्णय दोन दिवस पुढे ढकलला आहे. तसंच कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा लक्षात घेता कुणालाही परवानगी देऊ नये, असा सूरही पालिका अधिकाऱ्यांनी लावला.

शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. तर शिंदे गटानेही दादर येथील दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई पालिकेकडे अर्ज केला आहे.त्यावर परवानगी मिळो अथवा न मिळो शिवसेनेचा दसरा मेळावा होणारच. असा विश्वास शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरून बघत असतील आणि सांगत असतील ते की माझा मुलगा उद्धव हा शरद पवाराच्या नादाला लागून बिघडलाय. माझा मुलगा उद्धव हा सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडलाय. माझे विचार घेऊन तु पुढे चल तुझ्यासोबत मी आहे, असं बाळासाहेब आजवरून सांगत असतील. असा टोला रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

मी उद्धव ठाकरेंना सांगेन की शिवसेना तुम्ही नाही उभी केली. अनेक शिवसैनिकांचे खुन पडलेत. अनेकांना जेलमध्ये जावं लागलं, जीवन उद्धध्वस्त झालं, संसार उद्धधवस्त झालेत. तुमचं काय योगदान? असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे.

रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात केवळ तीनवेळा गेले. इतरवेळी ते मातोश्रीवर लपून खोके मोजत बसायचे. रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटायच्या.असा सणसणीत आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

त्यावर राजकारणात आरोप प्रत्यारोप चालत राहतात .मागील 6 महिन्यात राजकीय स्थर घसरत आहे.रामदास कदम यांच्या विरोधात शिवसेना उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे उपस्थित होते.

रामदास कदम यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनाही टोला लगावला. जगातला पहिला प्लास्टिक बंदीचा कायदा मी केला. जसा कायदा केला तसं आदित्य टूनटून उड्यामारुन मी केला, मी केला म्हणून ओरडू लागले. अरे तू काय केलं. तू अजून लग्न केलं नाही तू काय करणार आहेस. बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंत्री आणि मला काका-काका बोलून माझ्या जागेवर जाऊन बसला याला खरी गद्दारी म्हणतात, असं रामदास कदम म्हणाले. त्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या,विधान परिषदेवर निवडून येऊन सुद्धा रामदास कदमांना पर्यावरण मंत्री केलं . आदित्य ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिकबंदी केली हे रामदास कदम सांगत होते . असा टोला ला सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांना लागवला.

 

 

 

त्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा काम रामदास कदमांनी केलं आहे. अशी टीका सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांच्यावर केली.

आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घाणेरडे आरोप केले आहेत. यावर सुषमा अंधारे म्हणाल्या,अमरावतीच्या ताईंचं संतुलन ढासळलंय नाव न घेता नवनीत राणा यांच्यावर सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.

Share This News
error: Content is protected !!