घृणास्पद : या भाजी विक्रेत्याने तर हद्दच केली पार…नागरिकांनी दिला बेदम चोप; व्हिडिओ व्हायरल

616 0

बरेली : अन्न हे पूर्णब्रह्म ! असं आपण म्हणतो . पण जर का हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर यापुढे भाजी घेताना कुठून घेत आहात ? याविषयी दहा वेळा विचार कराल. हा व्हिडिओ आहे बरेलीतील इज्जत नगर या भागातील. हा व्हिडिओ शूट केला आहे दुर्गेश गुप्ता या ट्विटर युजरने आणि या भाजीविक्रेत्याचे नाव आहे शरीफ खान… हा व्हिडिओ भाजप कार्यकर्त्या प्रीती गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केला आहे.

हा व्हिडिओ बरेली मधील जरी असला तरी आपण ज्या भागात राहतो त्या भागातही अशी घटना होऊ शकते. कारण यापूर्वी देखील गटारीच्या पाण्यामध्ये भाज्या धुणे , पाणीपुरीच्या पाण्यामध्ये लघवी करणे असे प्रकार घडले आहेत.

या व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट पाहू शकतो की, हा वयोवृद्ध भाजीविक्रेता या भाज्यांवर थुंकतो आहे. एवढ्यावरच तो थांबला नसून त्या भाज्यांमध्ये तो लघवी देखील करतो आहे. हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी या भाजी विक्रेताला बेदम चोप देखील दिला आहे. तसेच प्रेम नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

Share This News
error: Content is protected !!