मनसेचं ‘मिशन विदर्भ’; राज ठाकरे विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात

391 0

नागपुर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून ( ता.18 सप्टेंबर) विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 8.30 वाजता विदर्भ एक्सप्रेसने नागपूरला पोहचले आहेत

आगामी महानगरपालिका  निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. पक्ष संघटन वाढविणे, हादेखील या दौऱ्यामागील उद्देश आहे. या दौऱ्यात ते नागपूर, चंद्रपूर व अमरावती येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी महानगर पालिका निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करून मार्गदर्शन करणार आहेत. नागपुरात आज त्यांचा मुक्काम असेल. उद्या दुपारी २ वाजता ते चंद्रपूरकडे प्रयाण करतील. तेथे उद्या त्यांचा मुक्काम असेल. तेथून मंगळवारी दुपारी ते अमरावतीकडे प्रयाण करतील. तेथे अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!