बिल्कीस बानो प्रकरण : बीडमध्ये मुस्लिम महिलांचा भव्य निषेध मूक मोर्चा

344 0

बीड : बिल्कीस बानो प्रकरणात बीड शहरात आज मुस्लिम महिलांचा भव्य निषेध मूक मोर्चा निघाला. या निषेध मोर्चामध्ये हजारो महिला सहभागी झाल्या. बीड शहरातील किल्ला मैदान कारंजा रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या अनुषंगाने बीड जिल्हा पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला होता.

निषेध मोर्चा मध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांची करडी नजर होती. मोर्चामध्ये प्रामुख्याने बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, मुस्लिम धर्मगुरूंबाबत वारंवार केला जाणाऱ्या वक्तव्याचा निषेध केला गेला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तासभर या महिलांचा ठिय्या दिला.

Share This News
error: Content is protected !!