डेथ इन्शूरन्स क्लेम करताना… ! नियम आणि कायदे

283 0

पॉलिसीधारकाच्या निधनानंतर त्याचा वारसदार पॉलिसी फंडसाठी दावा करू शकतो. यासाठी एलआयसीला वारसदाराकडून काही कागदपत्रांची गरज भासते. यासाठी नियम आणि कायदे देखील आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डेथ इन्शूरन्स क्लेम हा ऑफलाइन करावा लागेल. त्याची संपूर्ण प्रक्रिया ऑफलाइनच होते. याशिवाय पॉलिसीधारकाचा विमा एजंट किंवा डेवलपमेंट ऑफिसरची स्वाक्षरी लागते.

कोणत्या कागदपत्राची गरज ?
* विमाधारकाचे मूळ मृत्यू प्रमाणपत्र
* पॉलिसीचे मूळ कागदपत्र, बाँड
* वारसदाराचे पॅनकार्ड आणि आयडी प्रुफ
* डेथ इन्शुरन्स क्लेम फॉर्मवर विमाधारकाच्या विमा एजंटची किंवा विकास अधिकार्‍याची सही.
* वारसदाराचा कॅन्सल चेकची कॉपी किंवा बँक पासबुकची कॉपी जमा करावी लागेल. नाव, खाते क्रमांक आणि आयएफएससी कोडचे विवरण भरावे लागेल.

दावा कसा दाखल करावा?
* विमा दावा करण्यासाठी नॉमिनीला सर्वप्रथम होम ब्रँचमध्ये जावे लागेल. त्या ब्रँचला पॉलिसीधारकाच्या मृत्यूची माहिती द्यावी लागेल. तेथे अर्ज क्रमांक 3783, अर्ज क्रमांक 3801 आणि एनईएफटीचा अर्ज भरण्यास सांगितला जाईल. एनईएफटी अर्जात बँकेचे विवरण अचूक भरावे लागेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या खात्यात एलआयसी फंड ट्रान्सफर करेल.
* पॉलिसीधारकाचे मूळ मृत्यू प्रमाणपत्र, पॉलिसी बाँड, वारसदाराचे पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन परवाना किंवा पासपोर्ट आणि पॉलिसीधारकाचे कोणतेही मूळ ओळखपत्र जमा करावे लागेल. ही सर्व कागदपत्रे सेल्फ असेस्टेड असणे आवश्यक आहेत.
* अर्ज आणि कागदपत्रांसह एक इंटिमेशन लेटर देखील द्यावे लागेल. हे कव्हर लेटर असेल. त्यात विमाधारकाचा मृत्यू कोठे झाला आदींचा उल्लेख करावा लागतो.
* एनईएफटी अर्जाबरोबरच नॉमिनीला कॅन्सल चेक, पासबूक जमा करावे लागेल. पासबुकची झेरॉक्स दिली नाही तर आपले कागदपत्रे नामंजूर होतील.
* कागदपत्रांच्या सत्यप्रती अर्जाला जोडावे लागेल. शाखेत दाव्याची प्रक्रिया करत असताना वारसदाराला मूळ कागदपत्रे सोबत बाळगावी लागतील. कारण शाखाअधिकारी मूळ कागदपत्राच्या आधारे वरीष्ठांना मेल करू शकतात. म्हणून ऐनवेळी ते कोणत्याही कागदपत्रांची विचारणा करू शकतात. एकुणातच आपण सर्व तयारीनिशी शाखेत जायला हवे.
* कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर एक्नॉलेजमेंट स्लिप दिली जाईल. तीे व्यवस्थित ठेवा.
* संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिन्याच्या आत वारसदाराच्या खात्यात पॉलिसीचे पैसे जमा होऊ शकतात. पैसे मिळण्यास विलंब होत असेल तर शाखेत त्यासंबंधीची चौकशी करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!