Breaking News

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळ बरखास्त; उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचा आदेश

316 0

शिर्डी : मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठानं आज शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळ बरखास्त केलं.न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती एस. जी. मेहरे यांच्या खंडपीठानं आज सकाळी झालेल्या सुनावणीत श्री साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा आदेश दिला.

अधिक वाचा : भाजपाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे पुणे महापालिका भवनाच्या बाहेर तीव्र आंदोलन ; ‘बोट दाखवेल तेथे बोटसेवा सुरू झालीच पाहिजे’

नवीन विश्वस्त मंडळ गठीत करण्यात यावं तोपर्यंत नगरचे प्रधान न्यायाधीश, नगरचे जिल्हाधिकारी आणि संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी या त्रिसदस्यीय समितीनं संस्थानचा कारभार पाहावा, असं न्यायालयानं म्हटलं आहे. 16 सप्टेंबर 2021 रोजी 12 सदस्यांच्या नवीन विश्वस्त मंडळाची नेमणूक करण्यात आली होती. त्यात आशुतोष काळे अध्यक्ष आणि अ‍ॅड. जगदीश सावंत उपाध्यक्ष होते.

अधिक वाचा : पुणेकरांनो सावधान : पनीर कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाची तिसरी मोठी कारवाई ; २२ लाखाचा साठा जप्त

या समितीत 9 सदस्य आणि एक पदसिद्ध सदस्य होता. हे विश्वस्त मंडळ साईबाबा संस्थान कायदा 2004, विश्वस्त नेमणूक नियम 2013 आणि उच्च न्यायालयानं यापूर्वी दिलेल्या निर्देशांचं पालन न करता अस्तित्वात आलं आहे. त्यामुळं त्यांची नेमणूक बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला होता.

Share This News
error: Content is protected !!