NCP ANDOLAN

भाजपाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे पुणे महापालिका भवनाच्या बाहेर तीव्र आंदोलन ; ‘बोट दाखवेल तेथे बोटसेवा सुरू झालीच पाहिजे’

340 0

पुणे : रविवारी संध्याकाळी पुण्यात मुसळधार पाऊस झाला होता. पावसाचा जोर एवढा होता कि अगदी काही मिनिटातच रस्ते जलमय झाले . जागोजागी पाणी तुंबले त्यात वरून पावसाचा जोर त्यामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली . वाहतूक कोंडीने देखील त्रस्त आहेतच. त्यासह दुचाकी वाहूनजाणे आणि चारचाकींवर झाडपडीच्या देखील 2 घटना घाला आहेत. त्यामुळे भाजपाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने आज महापालिका भवनाच्या बाहेर तीव्र आंदोलन केले आहे.

बोट दाखवेल तेथे बोटसेवा सुरू झालीच पाहिजे, अशी मागणी करत राष्ट्रवादी पुणे शहराच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी खरीखुरी बोट राष्ट्रवादीने आणली होती. पुढील काळात सार्वजनिक वाहतुकीसाठी बोटीचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी राष्ट्रवादीने केली. पुणेकरांना खड्ड्यांत घालणाऱ्या भाजपाचा निषेध असो, पुणेकरांना पाण्यात बुडवणाऱ्या भाजपाचा धिक्कार असो, भाजपाचे करायचे काय – खाली डोके वर पाय, अशाप्रकारची घोषणाबाजी राष्ट्रवादीतर्फे यावेळी करण्यात आली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!