पुणे : फुलं देऊन पोलीसांनी कर्तव्यपालन न केल्याचा व्यक्त केला निषेध

305 0

पुणे : राजकीय नेते आणि संविधान यांचे एकमेकांच्या विरोधात आदेश असतील तर संविधानाचा आदेश पोलीसांनी पाळला पाहिजे.

कोणत्याही धर्माच्या कोणत्याही सणाला आमचा विरोध नाही मात्र सर्वधर्मीय सण आवाजमुक्त व्हावेत हे पाहणं पोलीसांचं कर्तव्य आहे, याबाबतीत सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या आदेशाचं पालन होईल हे पाहण्याची जबाबदारी पोलीसांची आहे. नेत्यांच्या दबावाला बळी पडून पोलीसांनी मुक्त परवानगी देणं योग्य नाही, अशी भूमिका ऍड. असीम सरोदे, डॉ. विश्वंभर चौधरी, मुकुंद किर्दात यांनी घेतली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांची भेट घेऊन त्यांना याविषयी पत्र देण्यात आले. वृद्ध, अपंग, विद्यार्थी, रूग्ण यांचं प्रचंड आवाजापासून संरक्षण करण्यात पुणे पोलीस पूर्णतः अपयशी ठरले ही सामान्य नागरिकांच्या मनातली खंत आज व्यक्त केली. पोलीसांनी कर्तव्यपालन न केल्याचा निषेध फुलं देऊन व्यक्त करण्यात आला.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!