पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासने पुरविली अहोरात्र वैद्यकीय सेवा

293 0

पुणे : पुणे शहर पोलीस विघ्नहर्ता न्यासच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश भक्तांसाठी अहोरात्र वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली. याचा लाभ 347 रुग्णांनी घेतला. एडमिट करावे लागलेले रुग्ण बारा, एका रुग्णाला हार्ट अटॅक आला होता त्याला आपत्कालीन वैद्यकीय उपचार देऊन ऍडमिट केले त्यामुळे त्याचे जीव वाचवण्यात यश मिळाले .

एकूण 130 स्वयंसेवकांनी सेवा बजावली. यामध्ये डॉक्टर्स ,नर्स ,वॉर्ड बॉय मदतनीस रुग्णवाहिका यांचा समावेश आहे . प्रामुख्याने आढळलेले पेशंट्स -गर्दीमुळे उन्हामुळे अति घाम आल्यामुळे चक्कर येणे अति आवाजामुळे लहान मुलांचे कान दुखणे गर्दीमध्ये पडल्यामुळे झालेले दुखापती बीपी वाढल्यामुळे चक्कर येणे शुगर डाऊन झाल्यामुळे चक्कर येणे जाणवल्या आहेत.

वैद्यकीय सेवा प्रमुख डॉक्टर मिलिंद भोई विश्वस्त विघ्नहर्ता न्यास, पुणे पोलीस समन्वयक डॉ.नंदकुमार बोरसे ,डॉ. नितीन बोरा, डॉ. कुणाल कामठे , डॉ.शंतनु जगदाळे, डॉ. प्रीती विक्टर, डॉ. कैवल्य सूर्यवंशी,सदाशिव कुंदेन, जयशंकर माने ,अशोक दोरूगडे, दिनेश मुळे , जयवंत जानुगडे विशेष सहकार्य शेट ताराचंद रुग्णालय पुणे, टिळक आयुर्वेद महाविद्यालय,रोटरी क्लब ऑफ पुणे डाऊन टाऊन,कात्रजकर ॲम्बुलन्स, माय माऊली वृद्धाश्रम यांनी केले.

Share This News
error: Content is protected !!